अभिनेता अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व

नियमांतर्गत रजिस्ट्रेशनद्वाराही भारतीय नागरिकत्व मिळवता येऊ शकते
अभिनेता अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व
Published on

मुंबई : आज स्वातंत्र्य दिनी अभिनेता अक्षय कुमार याला अखेर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. कॅनडाचे नागरिकत्व असणारा अक्षयकुमार भारतात आला अन् बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत भारतातच रमला. २०१९ पासून त्याने भारताचे नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न चालवले होते.

यापूर्वी अनेक माध्यमांनी अक्षयवर त्याच्या नागरिकत्वावरून टीका केली होती. त्याला लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रोलही होत असे. आता त्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याने चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी अक्षयकडे कॅनडा देशाचे नागरिकत्व होते. अक्षय भलेही दुसऱ्या देशाचा नागरिक असेल, पण त्याने भारत आणि भारतीयांप्रति आदर व्यक्त केला आहे.

जन्माने मिळते नागरिकत्व

जे लोक भारतात जन्माला येतात त्यांना भारताचे नागरिकत्व मिळते, पण १ जुलै १९८७च्या आधी भारतात जन्मलेल्या लोकांसाठी नियम सोपे होते. त्यानंतर जन्मलेल्या मुलांचे पालकही भारतीयच हवे, अशी अट आहे.

जी मुले २६ जानेवारी १९५० ते १० डिसेंबर १९९२ दरम्यान भारताबाहेर जन्माला आली, पण त्यांचे वडील भारतीय असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळत होते, पण १९९२ नंतर जन्माला आलेल्या बाळाच्या आई-वडिलांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळते.

रजिस्ट्रेशन करून मिळवता येते नागरिकत्व

काही नियमांतर्गत रजिस्ट्रेशनद्वाराही भारतीय नागरिकत्व मिळवता येऊ शकते. यासाठी व्यक्ती अर्ज करण्यापूर्वी ७ वर्षांपासून भारताचा रहिवासी असावा किंवा तो अखंड भारताचा रहिवासी असावा किंवा त्याचा लग्नाचा जोडीदार भारताचा नागरिक असावा, त्यांनाच नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय काही इतर निकषांनी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in