अभिनेता अमर उपाध्यायला फसवले, गुन्हा दाखल; शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटीला गंडा

मालिका अभिनेता अमर उपाध्याय याची फसवणूक केल्याप्रकरणी कुणाल शहा आणि हिनल मेहता या पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मालिका अभिनेता अमर उपाध्याय याची फसवणूक केल्याप्रकरणी कुणाल शहा आणि हिनल मेहता या पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने या दोघांनी अमरला सव्वाकोटी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अमर हर्षद उपाध्याय हा अंधेरी येथे राहत असून तो मालिका अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक नामांकित हिंदी आणि गुजराती मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्याची कुणाल आणि हिनलशी ओळख झाली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याने त्यांच्याकडे सुमारे सव्वाकोटीची गुंतवणूक केली होती. या रक्कमेतून त्यांनी त्याच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर खरेदी केले होते. परताव्याची रक्कम मिळत नसल्याने अमरने त्यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला होता. मात्र ते दोघेही विविध कारणे सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते.

कुणाल आणि हिनल यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमर उपाध्याय याने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कुणालसह त्याची पत्नी हिनल यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in