आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली : अशोक सराफ; पत्नीसह प्रेक्षक आणि सहकलाकारांचेही मानले आभार

निवेदिता माझ्यामागे कायम खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे घर बाजूला ठेवून....
आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली : अशोक सराफ; पत्नीसह प्रेक्षक आणि सहकलाकारांचेही मानले आभार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ सालचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर माझी आतापर्यंतची माझी धडपड सार्थकी लागल्याचे वाटतेय, अशी प्रतिक्रिया अशोकमामा यांनी दिली. “हा पुरस्कार मला मिळेल, याची कल्पनाही केली नव्हती. मी कुठेतरी चांगले काम करतोय आणि तुम्हाला सर्वांना ते आवडत आहे, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मला मिळाला, माझी आतापर्यंतची माझी धडपड सार्थकी लागली. मी काय करतोय हे मला आवडण्यापेक्षा, प्रेक्षकांना कसे आवडेल याचा मी कायम विचार केला. प्रेक्षक आहेत, तरच मी आहे,” असे अशोक सराफ यांनी सांगितले.

“माझ्या करिअरमधील संपूर्ण प्रवासात ज्या-ज्या व्यक्तींनी माझ्यासोबत काम केले, त्या प्रत्येकाचा सहभाग यात आहे. अभिनय एका माणसाकडून होत नसतो, त्यासोबत सहकारीदेखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यांनीही चांगले केले, तर संपूर्ण काम चांगले होत असते. माझ्या सहकलाकारांनी मला चांगली साथ दिली. त्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या या पुरस्कारासाठी सर्वांचे श्रेय आहे. निवेदिता माझ्यामागे कायम खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे घर बाजूला ठेवून मी माझ्या कामाकडे लक्ष देऊ शकलो,” अशा शब्दांत अशोक सराफ यांनी पत्नीसह प्रेक्षक आणि सहकलाकारांचेही आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in