अभिनेता कार्तिक आर्यन हा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला

कोरोनाचे संकट टळल्यानंतर यंदा नवीन सरकार सोबत कोणत्याही निर्बंधांशिवाय सर्वत्र बाप्पाच्या आगमनाने उत्साह
अभिनेता कार्तिक आर्यन हा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला

आजपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर यंदा नवीन सरकार सोबत कोणत्याही निर्बंधांशिवाय सर्वत्र बाप्पाच्या आगमनाने उत्साह संचारला आहे. मुंबईतील 'लालबागचा राजा' हे अनेक नामवंतांसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! गणेशोत्सव काळात ‘लालबागच्या राजाचे’ दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून भाविक मुंबईत येतात. अशातच आज अभिनेता कार्तिक आर्यन हा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे.

दरम्यान, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बी-टाऊनमधील इतर सेलिब्रिटीही येतात. मात्र, कोविड काळात याला ब्रेक लागला. आता यंदा पुन्हा एकदा नवा उत्साह आणि भाविक, सेलिब्रिटी दर्शनासाठी येत आहेत. कार्तिक लालबागच्या राजाच्या मंडपात येताच बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in