अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कार चालकाला बेदम मारहाण ; मालवणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबईमध्ये काही तरूणांनी गैरवर्तन करत त्याला मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे
अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कार चालकाला बेदम मारहाण ; मालवणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ती केवळ ऍक्टर नाही तर, ती डान्सर आणि जज म्हूणन सुद्धा काम करते. तिचं सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. ती नेहमी सोशल मीडिया ऍक्टिव्ह असते. तिचा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. तिने अनेक अप्रितीम चित्रपट केले आहेत. त्यामध्ये दुनियादारी, बालक पालक, मिमी, गजनी, क्लासमेट्स, सारखे चित्रपट आहेत. आता सई एका वेगळ्याचं कारणांमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये काही तरूणांनी गैरवर्तन करत त्याला मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना 13 ऑगस्टची असून या प्रकरणी मालवणी पोलिस स्टेशन मध्ये FIR नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Saddam Mandal सई सोबत गेली 6 वर्ष काम करत होता. त्याने सईला रविवारी रात्री चिंचोळी बंदर याठिकाणी सोडल्यानंतर हा प्रकार घडल्याचे FPJच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

त्याने पुढे सांगितले की, "मी सईला सोडल्यानंतर त्यांच्याचं कारने परत जात असताना काही किशोरवयीन मुले हे रस्त्याच्या मधोमध त्यांची बाईक चालवत होते. जेव्हा मी त्यांना हॉर्न वाजवला तेव्हा त्यांनी त्यांच्या दुचाकी थांबवल्या आणि मला बेल्ट आणि काठीने मारहाण केली. एवढेच नव्हे तर पुढे त्यांनी त्यांच्या मित्रांना देखील बोलावलं. यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यासाठी केली आणि जखमी करून पळून गेले. असं त्याने सांगितलं. पोलिसांकडून त्या चारही मुलांचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in