वीजचोरी विरोधातील कारवाई तीव्र; अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ४८६ गुन्हे दाखल, ४३.३९ कोटींची वीजचोरी उघड

वीजचोरी विरोधात मोहिम अधिक तीव्र करत अदाणी इलेक्ट्रिसिटीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४८६ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर छाप्यांमध्ये ७९.२५ टन अवैध वायरी जप्त केल्या असून १.९८ कोटी युनिट वीजचोरी पकडली आहे. या विजेची किंमत ४३.३९ कोटी रुपये आहे.
वीजचोरी विरोधातील कारवाई तीव्र; अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ४८६ गुन्हे दाखल, ४३.३९ कोटींची वीजचोरी उघड
वीजचोरी विरोधातील कारवाई तीव्र; अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ४८६ गुन्हे दाखल, ४३.३९ कोटींची वीजचोरी उघड
Published on

मुंबई : वीजचोरी विरोधात मोहिम अधिक तीव्र करत अदाणी इलेक्ट्रिसिटीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४८६ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर छाप्यांमध्ये ७९.२५ टन अवैध वायरी जप्त केल्या असून १.९८ कोटी युनिट वीजचोरी पकडली आहे. या विजेची किंमत ४३.३९ कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीने वीजचोऱ्या पकडण्यासाठी ३६ हजार ७२० छापे घातले. यात ४० टक्के छापे हे सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा किंवा सुट्टीच्या दिवशी मारण्यात आले होते. त्यामुळे आणखी ५८९७ वीज चोरीची प्रकरणे नोंदवण्यात आली. कंपनीच्या मते, वीजचोरीविरोधातील सातत्यपूर्ण कारवाईमुळे एकूण एटी अँड सी तोटा ४.७० टक्क्यांवरून ४.४६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या ग्राहकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, राष्ट्रीय स्तरावर सर्वात कमी एटी अँड सी तोटा असलेल्या वीज वितरण कंपन्यांमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीचा समावेश झाला आहे.

दक्षता विभागाने वर्षभरात अनेक मोठ्या वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या. त्यामध्ये ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मालाड पश्चिम येथील स्वस्तिक कंपाउंडमध्ये मोल्डिंग युनिटसाठी थेट वीजचोरी पकडली. चोरीच्या विजेची किंमत १.६३ कोटी रुपये होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in