अदानी कुटुंबाचे पाचशे अपंग नववधूंना अर्थसहाय्य; प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत

गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याच्या विवाहाच्या निमित्ताने मंगल सेवा उपक्रमामार्फत दरवर्षी पाचशे नवविवाहित दिव्यांग महिलांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य करण्याचा निर्णय अदानी कुटुंबाने घेतला आहे.
अदानी कुटुंबाचे पाचशे अपंग नववधूंना अर्थसहाय्य; प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत
एक्स @gautam_adani
Published on

मुंबई : गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याच्या विवाहाच्या निमित्ताने मंगल सेवा उपक्रमामार्फत दरवर्षी पाचशे नवविवाहित दिव्यांग महिलांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य करण्याचा निर्णय अदानी कुटुंबाने घेतला आहे.

अर्थसहाय्य करण्यासाठी मंगल सेवा हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी दरवर्षी पाचशे नवविवाहित दिव्यांग महिलांना प्रत्येकी दहा लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल. आपल्या विवाहाला दोन दिवस उरले असताना जीत याने या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या घरी २१ नवविवाहित दिव्यांग महिलांची व त्यांच्या पतीची भेट घेतली व त्यांना अर्थसहाय्य दिले.

जीत याचा विवाह ७ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. ‘सेवा साधना है, सेवा प्रार्थना है, और सेवाही परमार्थ है’ या तत्त्वानुसार गौतम अदानी यांनी आपला मुलगा जीत व दिवा यांच्या विवाहानिमित्त त्यांच्याकडून होत असलेल्या चांगल्या कामानिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करून आनंद व्यक्त केला. जीत व दिवा यांनी विवाहानिमित्त पाचशे नवविवाहित अपंग महिलांना प्रत्येकी दहा लाख रुपये सहाय्य देऊन मंगल सेवा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले आहे. या मंगल आणि पवित्र उपक्रमामुळे अनेक दिव्यांग भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आयुष्य आनंद आणि सन्मानाने उजळून निघतील, असेही गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

आईकडून घेतली समाजसेवेची प्रेरणा

आई डॉ. प्रीती अदानी यांच्यापासून प्रेरणा घेऊन जीत यांनी समाजसेवेच्या कामातही लक्ष घातले आहे. डॉ. प्रीती अदानी यांनी अदानी फाऊंडेशनचे रूपांतर मुंद्रा येथील एका छोट्या ग्रामीण प्रकल्पापासून जागतिक बदल घडवून आणू शकणाऱ्या मोठ्या शक्तीत केले आहे. दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्याच्या समाजसेवी उपक्रमांसह अन्य समाजसेवी उपक्रमांमध्येही जीत अदानी यांचा मोठा वाटा आहे.

logo
marathi.freepressjournal.in