
देशातील बडा अदानी उद्योगसमूह मोठी कंपनी ताब्यात घेण्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. अडाणी समूहाची सिमेंट एसीसी कंपनीसोबत चर्चा सुरू होती. त्यामुळे एसीसीवर ताबा मिळवला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अडाणी हे गेल्याच आठवड्यात या करारासाठी अबूधाबी व लंडनला गेले होते.
एसीसी कंपनीची मालकी होलसिम कंपनीची आहे. ही कंपनी मूळची स्वित्झर्लंडची आहे. एसीसीची सुरुवात १९३६ मध्ये मुंबईत झाली होती.
होलसिम कंपनीने भारतात १७ वर्षे कारभार केला. ही जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. या करारानंतर कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करू शकते. होलसिम समूहाकडे अंबुजा सिमेंट व एसीसी लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे. अंबुजा सिमेंटमध्ये होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडमार्फत होलसिमची ६३.१ टक्के हिस्सेदारी आहे. अंबुजा सिमेंटचे मूल्य ७३१२८ कोटी आहे.
तर एसीसीत अंबुजा सिमेंटची ५०.५ टक्के हिस्सा आहे. तर होलसिमचा ४.४८ टक्के हिस्सा आहे. होलसिमचा भारतातील व्यवसाय खरेदी करणाऱ्याला एसीसीच्या २६ टक्के हिश्श्यासाठी खुली ऑफर द्यावी लागेल. ती १०,८०० कोटींची असेल. अंबुजा सिमेंटची क्षमता ३.१ कोटी मेट्रीक टन आहे. तर अंबुजा व एसीसीची एकत्रित क्षमता ६४ दशलक्ष मेट्रीक टन आहे.