वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ मिनिटांत पूर्ववत, ग्राहकांसाठी अदाणीची एडीएमएस प्रणाली

मुंबई उपनगरातील ३१.५० लाख वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी अदाणी इलेक्ट्रिसिटीपार पाडते.
वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ मिनिटांत पूर्ववत, ग्राहकांसाठी अदाणीची एडीएमएस प्रणाली

मुंबई : मुंबई उपनगरातील ३१.५० लाख वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी अदाणी इलेक्ट्रिसिटीपार पाडते. वीज ग्राहकांसाठी एक पाऊल पुढे टाकत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुढील १५ मिनिटांत पूर्ववत करण्यात येणार आहे. यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने अॅडव्हान्स डिस्ट्रिब्युशन मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात एडीएमएस प्रणाली अंमलात आणली आहे. देशात पहिल्यांदाच प्रगत वितरण व्यवस्थापन प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे.

पवईतील या अद्ययावत कार्यक्षम पर्यवेक्षी नियंत्रण व डेटा अधिग्रहण अर्थात स्काडा प्रणालीमध्ये नव्या व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे वीज प्रवाह खंडित होण्याचा अंदाज बांधणे व वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी समस्या ओळखणे शक्य होईल. तसेच या प्रणालीमुळे वीज वाहिन्यांमधून ग्राहकांच्या घरांपर्यंत वीज पोहोचवण्याचा प्रवास पाहता येईल. याशिवाय तांत्रिक बिघाड झालेले ठिकाणही ओळखता येईल. वीज समस्यांचे निराकरण करताना इतरत्र वीजपुरवठा पोहोचवणे प्रगत वितरण प्रणालीमुळे शक्य होणार आहे. तसेच वीज प्रवाहाचा समतोल राखण्याबरोबरच सौर आणि पवन ऊर्जासारख्या अक्षय्य ऊर्जा स्रोतांचे वीज वितरण करणे शक्य होईल. वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण कमी करणे, गुणवत्तेत सुधार करणे, हे प्रगत वितरण व्यवस्थापन प्रणालीचे उद्दिष्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in