'अदानी'च्या स्वाभिमान उपक्रमामुळे महिलांना रोजगार

भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना एकमेकांच्या साथीने सर्वांचा विकास करता यावा
'अदानी'च्या स्वाभिमान उपक्रमामुळे महिलांना रोजगार

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाऊंडेशन यांच्या स्वाभिमान सीएसआर उपक्रमामुळे मुंबईतील साडेतीन हजार वंचित महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या उपक्रमाद्वारे महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची आणि उपजीविकेची साधने आणि संधी दिल्या जातात.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना एकमेकांच्या साथीने सर्वांचा विकास करता यावा यासाठी स्वयंसहाय्यता गट हे महत्त्वाचे साधन असून ती संधी महिलांनी साधावी, असे अदानी फाऊंडेशनचे प्रवक्ते सुबोध सिंह यासंदर्भात म्हणाले. स्वाभिमान उपक्रमाद्वारे महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय संधी तसेच त्यांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी साधने दिली जातात. वंचित महिलांना उपजीविकेची साधने देण्यातही स्वयंसहाय्यता ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावतात. याद्वारे महिलांना उद्योगांच्या अनेक संधी मिळतात, असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in