अदाणीच्या स्मार्ट मीटर अंमलबजावणीला वेग येणार; संयुक्त अरब अमिरात स्थित कंपनीशी करार

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईने पहिल्या टप्प्यात नियोजित केलेल्या ७ लाख स्मार्ट मीटरपैकी बहुतांश स्मार्ट मीटर यापूर्वीच स्थापित आहेत.
अदाणीच्या स्मार्ट मीटर अंमलबजावणीला वेग येणार; संयुक्त अरब अमिरात स्थित कंपनीशी करार
PM

मुंबई : अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या खाजगी पारेषण आणि वितरण कंपनीने देशातील स्मार्ट मीटरिंग व्यवसायातील स्थान भक्कम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जागतिक स्तरावरील वैविध्यपूर्ण अशा अदाणी समुहाचा भाग असलेल्या या उपकंपनीने भारतासह इतर देशांमध्ये स्मार्ट मीटरिंग प्रकल्प राबवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातस्थित एस्यासॉफ्ट होल्डिंग्जबरोबर ४९:५१ संयुक्त भागीदारी केली आहे.

अदाणी ट्रान्समिशन स्टेप-फोर लिमिटेड या तिच्या पूर्ण मालकी असलेल्या उपकंपनीद्वारे अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने एस्यासॉफ्ट होल्डिंग्ज लिमिडेटच्या स्मार्ट मीटरिंग सुविधा पुरविणाच्या व्यवसायातील ४९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. परिणामी कंपनीचे नाव बदलून आता अदाणी एस्यासॉफ्ट स्मार्ट सोल्युशन्स लिमिटेड असे करण्यात आले आहे. अदाणी आणि अबू धाबीची इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी यांच्यातील व्यावसायिक संबंध या व्यवहारामुळे अधिक दृढ झाले आहेत. आयएचसी ही तिची उपकंपनी सिरियस इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे एस्यासॉफ्टमध्ये एक प्रमुख भागधारक आहे.

अदाणी एनर्जी सोल्युशन्सच्या विद्यमान आणि नजीकच्या कालावधीतील वीज तंत्रज्ञानाबाबतच्या गरजांची पूर्ती करण्यासह ही संयुक्त भागीदारी भारतीय आणि जागतिक स्तरावर आवश्यक मागणीसाठी बोली लावून त्याची अंमलबजावणी करेल. यात भारतासह, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटनमधील सुमारे १०० तज्ज्ञ सहभागी आहेत. ते प्रमुख भारतीय वितरण कंपन्या, स्कॉटिश गॅस आणि संयुक्त अरब अमिरात-स्थित कंपन्या जसे की – एफईडब्ल्युए, डीईडब्ल्युए, एसईडब्ल्युए तसेच एडीडीसी यांनाही सेवा देतात.

क्लाउड आणि आयओटी-आधारित ऊर्जा व्यवस्थापन सुविधा देणार्‍या एस्यासॉफ्टची उत्पादने ही स्वयंचलित ऊर्जा पुरवित आहेत. यामध्ये बौद्धिक संपदाचे (आयपी) समृद्ध भांडार आहे. ते मीटर डेटा व्यवस्थापन प्रणाली, हेडएंड सिस्टम, मागणीप्रसंगीचे वीजभार व्यवस्थापन, ऊर्जा लेखापरिक्षण, मीटरिंग, देयके आणि संकलन, मोबिलिटी सोल्युशन, भार अंदाज दरम्यानचे डेटा विश्लेषण यासह वीजचोरीचे विश्लेषण, ग्राहक वर्तन विश्लेषण आणि जीआयएस वगैरे अनेक स्मार्ट सुविधा देऊ करत आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईने पहिल्या टप्प्यात नियोजित केलेल्या ७ लाख स्मार्ट मीटरपैकी बहुतांश स्मार्ट मीटर यापूर्वीच स्थापित आहेत. स्मार्ट मीटरिंग व्यवसाय बाजारपेठेचा आकार लवकरच सुमारे २५ कोटी पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. पैकी ८ कोटी मीटरसाठीची निविदा प्रक्रिया ही तूर्त प्रतिक्षेत आहे. हेदेखील नजीकच्या भविष्यात याबाबतच्या पुरेशी वाढीची संधी दर्शवते.

स्मार्ट मीटरिंग व्यवसायाच्या अखंड राष्ट्रीय कार्यान्तिततेकरिता महत्त्वपूर्ण आणि एकात्मिक उपाय प्रदान करण्यासाठी एक विशिष्ट संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी एस्यासॉफ्टबरोबर व्यावसायिक भागीदारी करताना अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिडेटला खूप आनंद होत आहे. स्थानिक पातळीवर आम्हाला भक्कम अंमलबजावणी उपलब्ध करून देण्याबरोबरच ही भागीदारी आंतरराष्ट्रीय भौगोलिक क्षेत्रांमध्ये विशेषत ज्या प्रांतात स्मार्ट मीटरिंग संकल्पना जोर धरत आहे अशा ठिकाणी नवीन दृश्ये स्थापित करेल. आणि अशा संधींचा आक्रमकपणे पाठपुरावा केला जाईल”, असे अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिडेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in