आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रशासकीय कात्रीत अडकला

प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रशासकीय कात्रीत अडकला

मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आल्यानंतर प्रत्येक निर्णय झटपट होईल, असे वाटत होते; मात्र दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देण्यात येणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी अद्याप ५० शिक्षकांची निवड करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलेले नाही. त्यामुळे यंदाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रशासकीय कात्रीत अडकला आहे.

७ मार्च रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ८ मार्चपासून प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रशासकीय राज्य आल्यापासून अनेक निर्णय प्रलंबित असून, दरवर्षी देण्यात येणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने शिक्षकांना सन्मानित करण्यात येते; मात्र यंदा मुंबई महापालिकेत ८ मार्चपासून प्रशासकीय राज्य आले आहे; मात्र आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी अद्याप ५० शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवसाचा विसर पडला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in