मुंबईकरांच्या चिंतेत भर ; रुग्णदुपटीचा कालावधी घटला

२०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ११ हजारांवर पोहोचली होती
मुंबईकरांच्या चिंतेत भर ; रुग्णदुपटीचा कालावधी घटला
Published on

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णदुपटीच्या कालावधीत झपाट्याने घट होत आहे. १८ दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी ३,५६१ दिवसांवरून थेट ५६१ दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ११ हजारांवर पोहोचली होती. तर डिसेंबर २०२१मध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती; मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले आहे. आता चौथ्या लाटेचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णदुपटीच्या कालावधीत झपाट्याने घट होत आहे. रुग्णदुपटीच्या कालावधीत झपाट्याने होणारी घट ही चिंतेची बाब असून मुंबईकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

चौथ्या लाटेचा शिरकाव झपाट्याने होत असून, रोज आढळणारी रुग्णसंख्या दोन हजारच्या जवळपास पोहोचली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३,९७३ वरून ५६१ दिवसांवर म्हणजे सातपटीने घसरला आहे. २५ मे रोजी रुग्णदुपटीचा कालावधी ३,९७३ वर गेला होता. मागील काही दिवसांत यात झपाट्याने घसरण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रोज कोरोना मृत्यूची नोंद बहुतांश वेळा शून्य नोंद होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही समाधानकारक राहिले आहे; मात्र मागील काही दिवसांत सलग मोठ्या फरकाने रुग्णसंख्या वाढत आहे. रोज २०० ते २५०च्या दरम्यान रुग्णांत वाढ होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in