मरीन लाईन्सच्या सौंदर्यात भर; हेरिटेज पोल पर्यटकांचे आकर्षण ठरणार

याठिकाणी हेरिटेज लूकचे पोल बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मरीन लाईन्सच्या सौंदर्यात भर;  हेरिटेज पोल पर्यटकांचे आकर्षण ठरणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या मरीन लाईन्स परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. याठिकाणी हेरिटेज लूकचे पोल बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८७ लाख १९ हजार ७६३ रुपये खर्च करणार आहे.

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, हुतात्मा चौक ते मरीन लाईन्सदरम्यान नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात सायकल ट्रॅक, पर्यटकांना बसवण्यासाठी आसन व्यवस्था, शौचालयांची बांधणी अशी विविध कामे पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मरीन लाईन्सचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यात मरीन लाइन्स परिसरात ब्रिटिश काळात सौंदर्य फुलवणारे हेरिटेज पोल बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे मरीन लाईन्स परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून संध्याकाळनंतर या ठिकाणाचे दृश्य डोळ्यात सामावून घेणारे असणार, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in