
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. रविवारी पुण्यात बीए ४ चे १९ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १७ रुग्ण आढळल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या १३२ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ५७ वर पोहोचली आहे. बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चा १ तर बी ए.५ चे १८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बी ए. २.७५ व्हेरियंटचे देखील १७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे.