मुंबई-छपरा दरम्यान अतिरिक्त २२ स्पेशल गाड्या; अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. प्रवाशांच्या मागणीनुसार, २२ विशेष ट्रेन सेवा चालवण्यात येत असून, मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकात गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई-छपरा दरम्यान अतिरिक्त २२ स्पेशल गाड्या; अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी पडल्याने बहुतांश लोक गावी जातात. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मुंबई-छपरा दरम्यान अतिरिक्त उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. प्रवाशांच्या मागणीनुसार, २२ विशेष ट्रेन सेवा चालवण्यात येत असून, मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकात गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

‘या’ थांब्यावर थांबणार

कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया

‘अशा’ धावतील उन्हाळी स्पेशल गाड्या

  • ०५१९४ साप्ताहिक विशेष १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी ९.४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०८.५० वाजता छपरा येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

  • ०५१९३ साप्ताहिक विशेष १८ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर गुरुवारी ३.२० वाजता छपरा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

आजपासून तिकीट आरक्षण

ट्रेन क्र. ०५१९४ साठी विशेष शुल्कावर बुकिंग रविवार, १४ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in