पूर्व व पश्चिम उपनगरातील रुग्णालयांत अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार

केईएम, नायर, सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालय आहेत.
पूर्व व पश्चिम उपनगरातील रुग्णालयांत अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार

उपनगरवासियांची रुग्णालयांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय लवकरच दूर होणार आहे. पूर्व व पश्चिम उपनगरातील रुग्णालयांच्या विस्तार होत असून तब्बल दोन हजार अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे उपनगरवासियांना दिलासा मिळणार आहे.

केईएम, नायर, सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालय आहेत. मोफत व योग्य उपचार पद्धतीमुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात धाव घेतात. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. त्यामुळे पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. रुग्णांची वाढत्या गर्दीमुळे या सगळ्या रुग्णालयांवर मोठा ताण येतो आणि रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयीन कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होतो. मात्र उपनगरातील रुग्णालयांच्या विस्तारामुळे या रुग्णालयांतील ताण कमी होईल, असा विश्वास उपायुक्त संजय कुर्‍हाडे यांनी व्यक्त केला.

उपनगरवासियांनाही परिसरातील रुग्णालयात उपचार मिळतील आणि त्यांची गैरसोय दूर होईल, असेही ते म्हणाले. मुलुंड, भांडुप, गोवंडी, दहिसर, वांद्रे येथील रुग्णालयांचा विस्तार होत असून पुढील सहा महिन्यांत ही रुग्णालये रुग्णांच्या सेवेत येतील, असेही कुऱ्हाडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in