फ्लडिंग पॉइंटवर पालिकेची नजर; पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे पालिकेचे निर्देश

मुंबईत ठिकठिकाणी तब्बल ३८६ फ्लडिंग पॉइंट आढळले असून त्याठिकाणी पालिकेने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. तरीही पावसाळ्यात फ्लडिंग पॉइंट पाण्याखाली जातात. फ्लडिंग पॉइंट परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिल्याचे अभिजीत बांगर म्हणाले.
फ्लडिंग पॉइंटवर पालिकेची नजर; पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे पालिकेचे निर्देश

मुंबई : पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने नालेसफाई, नाल्यातील गाळ उपसा यावर जोर दिला आहे. तर पावसाळ्यात फ्लडिंग पॉइंट परिसरात पाणी तुंबणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत लहान, मोठे अशा एकूण १,८१७ नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम सुरू केले आहे. मिठी नदीतील ३० ते ४० टक्के गाळ उपसा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर लहान, मोठ्या नाल्यातील १० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च महिन्यात ५ टक्के, एप्रिल महिन्यात ३० टक्के व मे महिन्यात ४० टक्के असे मे अखेरपर्यंत ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे लक्ष्य असून ते वेळीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत ठिकठिकाणी तब्बल ३८६ फ्लडिंग पॉइंट आढळले असून त्याठिकाणी पालिकेने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. तरीही पावसाळ्यात फ्लडिंग पॉइंट पाण्याखाली जातात. फ्लडिंग पॉइंट परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिल्याचे ते म्हणाले.

  • एकूण छोटे नाले : १५०८ (लांबी ६०५ किमी)

  • एकूण मोठे नाले : ३०९ (लांबी २९० किमी)

  • रस्त्याखालील ड्रेन : ३१३४ किमी

logo
marathi.freepressjournal.in