रेल्वे स्थानकांवरील गणेशभक्तांच्या गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे पोलीस तैनात

चिंचपोकळी, करी रोड, सँडहर्स्ट रोड स्थानकांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात
रेल्वे स्थानकांवरील गणेशभक्तांच्या गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे पोलीस तैनात

गणेशत्सवात मुंबईतील गणपती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेशभक्त दररोज येत असतात. बहुतांश भक्त रेल्वेमार्ग येत असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रतिदिन प्रवास करणारे रेल्वे प्रवासी आणि गणेशभक्तांच्या एकत्रित गर्दीने स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पोलिसांनी महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे पोलीस तैनात करत गर्दीचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानकात विनादुर्घटना प्रवाशांचा सुखरूप प्रवास होत आहे.

देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरी होत असताना सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. यामध्ये मुंबईच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण असणाऱ्या गणेशभक्तांची संख्या सर्वाधिक असून चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी रेल्वे स्थानकांवरून येत आहे. यावेळी कोणताही दुर्घटना होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केलीय आहे. आरपीएफ आणि जीआरपी यांनी एकत्रित येत प्रवाशांच्या, गणेशभक्तांच्या सुरक्षेस प्राधान्य दिले आहे.

या स्थानकांवर अतिरिक्त मनुष्यबळ

गणेश दर्शनासाठी येणारे भक्त लक्षात घेऊन मध्य रेल्वे आरपीएफ आणि जीआरपीच्या समन्वयाने चिंचपोकळी, करी रोड, सँडहर्स्ट रोड स्थानकांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. या स्थानक परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीत करण्यासाठी रेल्वे पोलीस सुरक्षा कर्मचारी सहकार्य करत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in