
मुंबई : गुजरातचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग शहा यांची मुंबई हायकोर्टात अतिरिक्त सॉलिसिटर
जनरलपदी सहा महिन्यांसाठी नियुक्ती झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, मुंबई उच्च न्यायालयाचा कार्यभार देवांग गिरीश व्यास, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, गुजरात उच्च न्यायालय यांच्याकडे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सोपविण्यास मान्यता दिली आहे. २० जुलै रोजी भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने याबाबत सूचना जारी केली आहे.