अभय योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त करमाफी: १ लाख ७० हजार लाभार्थी; थकीत पाणीपट्टी भरणाऱ्यांना दिलासा

मुंबई शहरात सुमारे १ कोटी ४० लाख पेक्षा जास्त नागरिक असून त्यांना दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी पुरविण्यात येते.
अभय योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त करमाफी: १ लाख ७० हजार लाभार्थी; थकीत पाणीपट्टी भरणाऱ्यांना दिलासा

मुंबई : पाण्याचे बिल वेळेत न भरणाऱ्यांना २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. मात्र पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना अंमलात आणली असून या योजनेंतर्गत १ लाख ७० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

ग्राहकांना पाण्याचे बिल दिलेल्या तारखेपासून एका महिन्यात पाण्याचे बिल भरणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास त्यावर दोन टक्के अतिरिक्त आकारणी केली जाते. मात्र या अतिरिक्त शुल्क आकारात जल जोडणी धारकांना विशेष सूट देण्यासाठी अभय योजना १५ फेब्रुवारी, २०२० पासून सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अवघ्या दहा महिन्यात म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५६ हजार ९६४ जल जोडणी धारकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे अभय योजनेला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई शहरात सुमारे १ कोटी ४० लाख पेक्षा जास्त नागरिक असून त्यांना दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. नागरिकांना पिण्याचे शुद्ध व पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, यासाठी दरवर्षी तब्बल ३ हजार ४०० कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम खर्च होतो.

त्यामुळे थकित पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. मात्र काही ग्राहक पाणीपट्टी वेळेत भरत नसल्यामुळे थकीत बिलाची रक्कम वाढत जाते. पालिकेला जल व मलनिस्सारण आकारातून दरवर्षी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु थकबाकीदारांची संख्या वाढू लागल्यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट झाली होती. मात्र अभय योजनेमुळे फेब्रुवारी २०२० ते डिसेंबर २०२३ या कालावधी सुमारे एक लाख ७० हजार ३६३ ग्राहकांनी थकीत बिल भरण्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in