तुम्ही हिंदी बघा, आम्ही मराठीचे बघतो; आदित्य ठाकरेंची महायुतीसह मनसेवर टीका

एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शाळांमध्ये हिंदी सक्तीचा घाट घातला जात आहे.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शाळांमध्ये हिंदी सक्तीचा घाट घातला जात आहे. तुम्ही हिंदी बघा आम्ही मराठीचे बघतो बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही खेळी असून हिंदी भाषेचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी आणला आहे, असा घणाघात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीसह मनसेवर केला. गार गाई प्रकल्पात ५ लाख, गडचिरोलीत मायनिंगच्या एका प्रकल्पासाठी दीड लाख झाडांची कत्तल होणार आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही तर विनाशाच्या विरोधात आहोत. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा छुपा अजेंडा आहे. राष्ट्रपतींकडे या विरोधात तक्रार करणार असून महाराष्ट्रचा विनाश होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी महायुतीला दिला.

ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, शहरातील उष्णता, उष्माघाताने होणारे मृत्यू आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याचा सामना सध्या करावा लागतो आहे. तरीही स्टेट वाइल्डलाइफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लाखो झाडांची कत्तल करण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर केले आहेत. आधीच वातावरणीय बदल होत असताना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या झाडाच्या कत्तलीमुळे

त्यात वाढ होणार आहे. एसंशि सरकारने मुंबई, ठाणे, पुणे यासह अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली. याचे मोजमाप कुठेही लागणार नाही.

महायुतीच्या काळात गुन्हेगारी वाढली

महायुतीच्या काळात मुंबई, नागपूर, पुणे येथे दंगली वाढल्या आहेत. गृहखाते त्याला आळा घालण्यासाठी काय करत आहे. गृहमंत्री हे विरोधी पक्षाच्या मागे लागणे, विरोधकांना त्रास देणे, एवढेच काम करत आहेत, असा आरोप केला. तसेच तीन तिघाडीत महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे आणि उद्योजक येत नाहीत. राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यास गृहमंत्री आणि महायुती सरकार अपयशी ठरले आहे, असा निशाणा ठाकरेंनी महायुती सरकारवर साधला.

logo
marathi.freepressjournal.in