Aditya Thackeray wrote letter : आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना पत्र; काय म्हणाले पत्रात?

Aditya Thackeray wrote letter : आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना पत्र; काय म्हणाले पत्रात?

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या वरळी मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना वरळी मतदार संघात ३ वर्षे पूर्ण झाली. याचे निमित्त साधून त्यांनी वरळीकरांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, उत्तम विकासकामे झाल्यानेच वरळीकरांचा हेवा वाटतो. मी वरळीकरांना ए + चे वचन दिले होते. यामुळे अनेक कामे मार्गी लागली. असे म्हणत त्यांनी वरळीकरांना भावनिक साद घातली आहे. हे पत्र ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन पोहचवत आहेत.

आदित्य ठाकरे यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, "महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहेत. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी ए+ चे वचन दिले होते. गेल्या तीन वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एकसंघ म्हणून काम करत आहोत. नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो किंवा सामुदायिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राईव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो, आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत."

"म्हणूनच राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष, त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करते आणि त्यांना देखील वरळीत यावंतसं वाटतंय." असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. पुढे त्यांनी म्हंटले की, "यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करुन लोकहिताचा विचार करणारं सरकार पाडलं गेलं. पण आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहिल."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in