आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची दीड महिन्यात दुसऱ्यांदा बदली

किरण दिघावकर यांची, जी/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांची ई-वार्ड भायखळा येथे ४ जुलै रोजी बदली करण्यात आली होती
आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची दीड महिन्यात दुसऱ्यांदा बदली
Published on

राज्यात सत्तांतर झाले की मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. नव्याने सत्तेवर आलेले मुख्यमंत्री, मंत्री हे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी इच्छित ठिकाणी लावतात. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष मर्जीतील अधिकारी किरण दिघावकर यांची शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून अवघ्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.

किरण दिघावकर यांची, जी/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांची ई-वार्ड भायखळा येथे ४ जुलै रोजी बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागेवर के/पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नेमणूक करण्यात आली. आता पुन्हा एकदा १२ ऑगस्ट रोजी किरण दिघावकर यांची साहाय्यक आयुक्त 'ई' विभाग या पदावरून उचलबांगडी करून त्यांना साहाय्यक आयुक्त पी/ उत्तर विभाग या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सोबतच एफ/दक्षिण साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांची 'ए' विभाग साहाय्यक आयुक्तपदी, तर पी/ उत्तर साहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची एफ/ दक्षिण विभाग साहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, अजय कुमार यादव, कार्यकारी अभियंता ( परिवहन) यांच्याकडे साहाय्यक आयुक्त 'ई' विभाग यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in