मोठी बातमी! शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडियोप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडियो प्रकरणी पोलिसांना आत्तापर्यंत ४ जणांना अटक
मोठी बातमी! शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडियोप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडियोचा मुद्दा आता चांगलाच गाजताना दिसत आहे. काल पत्रकार परिषदेमध्ये शीतल म्हात्रे आणि आमदार नरेश म्हस्के यांनी मातोश्रीवर थेट आरोप केले. तर, आज मुंबई पोलिसांनी या व्हायरल व्हिडीयो प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे ठाकरे गटाचे युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य असून ते आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडियो मॉर्फ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मानस कुवर आणि अशोक मिश्रा यांना ताब्यात घेतले असून हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in