
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून सोमय्या महाविद्यालयात तब्बल ४७ विद्यार्थ्यांचे नियमबाह्य प्रवेश केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोमय्या ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालयातील लिपिकांनी विद्यार्थ्यांच्या बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल्याच्या आधारे ४७ विद्यार्थ्यांना नियमबाहय प्रवेश मिळवून दिल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. याप्रकरणी महाविद्यालयातील लिपीकांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
मुंबई महानगरक्षेत्रातील सोमय्या ट्रस्ट संस्थेच्या एस. के. सोमय्या विनयमंदीर व ज्युनिअर कॉलेज विद्याविहार, के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्स, विद्याविहार आणि के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स, विद्याविहार या कनिष्ठ महाविद्यालयांत सन २०२४-२५ या वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण ४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमबाह्य झाल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्याकडे केली होती.
त्याअनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयास भेट देवून प्राथमिक चौकशी केली.