किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्‍याकडे दुर्लक्ष!

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या अभ्यासातून समोर
किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्‍याकडे दुर्लक्ष!

मुंबई : कोविड महामारीमुळे अचानक बदलेल्या जीवनशैलीमुळे, बेरोजगारी, कामाचा ताण, घरून अभ्यास, ऑनलाइन क्लास आणि घरात राहिल्याने वाढलेल्या तणावामुळे प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यावर झाला. किशोरवयीन मुले देखील यात भरडली गेली. एसबीएफ म्हणजेच सलाम बॉम्बे फाउंडेशनने शहरातील झोपडपट्ट्यांमधील धोका असलेल्‍या किशोरवयीनांच्‍या स्‍वास्‍थ्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी कोविड महामारीदरम्‍यान पुढाकार घेतला होता.
कोविड काळात अनेक किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड महामारीचा किशोरवयीनच्‍या, विशेषत: वंचितांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम झाला आहे, ज्‍यामधून त्‍यांना मोठ्या संकटांचा सामना करण्‍यास मदत करण्‍यासाठी सकारात्‍मक हस्‍तक्षेपांची गरज दिसून येते. सामान्‍यत: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्‍याबाबत विविध संशोधन करण्‍यात आले असले तरी काही संशोधन वैज्ञानिक व प्रमाणित स्‍केलरवर आधरित मूल्‍यांकनावर लक्ष केंद्रित करतात. सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने केलेल्‍या संशोधनामध्‍ये मुंबईच्‍या २० वॉर्डांमधील सरकारी व पालिका शाळांमधील (इयत्ता ७ वी ते ९वी) ४,१२७ झोपडपट्टी किशोरवयीन मुलांची या अभ्यासात नोंदणी केली गेली.

जागृकतेची गरज
फेब्रुवारी ते जून २०२२ या कालावधीत करण्‍यात आलेल्‍या संशोधनामधून किशोरवयीनांमध्‍ये मानसिक आरोग्‍यासंबंधित समस्‍यांचे प्रमाण निदर्शनास आले. तसेच, त्‍याबाबत जागरूकता अत्‍यंत कमी म्हणजेच फक्त ६ टक्‍के होती. या संशोधनात सहभागी झालेल्या ६७ टक्‍के विद्यार्थ्‍यांनी एकटे राहण्‍यास प्राधान्‍य दिले. ५६ टक्‍के विद्यार्थ्‍यांनी राग, फसवणूक, भांडण व चोरी अशा वर्तणूकसंबंधित समस्‍यांची देखील नोंद केली. भावनिक समस्‍या वगळता मुलींपेक्षा अधिक मुलांनी मानसिक आरोग्‍याविषयक समस्‍यांची (सर्व प्रकारच्‍या) नोंद केली, जेथे लैंगिक असमानता किरकोळ होती.

हे महत्त्वाचे...
मानसिक आरोग्य मॉड्यूल्‍स आणि प्रशिक्षित समुपदेशकांना सरकारी/महापालिका शाळांचा महत्त्वपूर्ण भाग बनवले पाहिजे.
किशोरवयीनांना लक्ष्‍य करणारी प्रबळ कृती योजना तयार करण्‍याची देखील गरज.
विद्यमान मानसिक आरोग्‍य धोरणे व उपक्रमांचे विश्‍लेषण करणे.
सहकारी शिक्षक व इतर माध्‍यमांद्वारे मुलांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याची गरज.
लक्षणे व धोक्‍याची चिन्‍हे ओळखण्‍यास प्रशिक्षण.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in