राजभवनाला २७ वर्षांनंतर मिळाले पाइपगॅसचे कनेक्शन

राज्यपालांच्या सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या १२ बंगल्यांना लवकरच पीएनजीचा पुरवठा केला जाईल
राजभवनाला २७ वर्षांनंतर मिळाले पाइपगॅसचे कनेक्शन

राजभवन म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवास. या राजभवनाला २७ वर्षांनंतर शुक्रवारी पीएनजी गॅसचे कनेक्शन मिळाले आहे. राज्यपालांच्या बंगल्यात महानगर गॅस कंपनीने (एमजीएल) पीएनजीचा पुरवठा सुरू केला. राज्यपालांच्या सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या १२ बंगल्यांना लवकरच पीएनजीचा पुरवठा केला जाईल, असे एमजीएल कंपनीने सांगितले.

एमजीएलने मीडियम डेन्सिटी पॉलिथिलीनची पाईपलाईन या गॅस पुरवठ्यासाठी वापरली आहे. ती तीन किमी आहे. त्यातील दीड किमीची पाईपलाईन राजभवनात व अन्य दीड किमी हे राजभवनाबाहेरील रस्त्यावर टाकण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार म्हणाले की, एमजीएलच्या सहकार्याने राजभवनात पीएनजी पुरवठा सुरू झाल्याचे सांगायला आनंद होत आहे. ‘जयभूषण’ या बंगल्यातील किचनमध्ये थेट गॅस पुरवठा सुरू झाला.

राज्याच्या सर्वोच्च पदावरील सन्माननीय राज्यपालांच्या निवासस्थानी पीएनजीचे कनेक्शन जोडल्याचा मान एमजीएलला मिळाला आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आमची जोडणी झाली आहे, असे एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक आशू सिंघल यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in