तब्बल ५ वर्षे ५ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर डिलाईट रोड वाहतुकीसाठी खुला होणार; आदित्य ठाकरेंनाही उद्घाटनाचं आमंत्रण

या मार्गिका खुल्या केल्याने दक्षिण आणि उत्तर मुंबईतील अंतर हे कमी होणार आहे.
तब्बल ५ वर्षे ५ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर डिलाईट रोड वाहतुकीसाठी खुला होणार; आदित्य ठाकरेंनाही उद्घाटनाचं आमंत्रण

तब्बल ५ वर्षे ५ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारी ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळचा डिलाईल पूल वाहूकीसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे दक्षिण आणि उत्तर मुंबईचा प्रवास सुसाट होणार आहे. आज(गुरुवार २३ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि पश्चिम उपनकरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पूल आणि सरकत्या जिन्याचे लोकार्पण केलं जाणार आहे.

२०१८ साली या पुलाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. यावेळी या पुलावरुन केली जाणारी बेस्ट बसची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. लोअर परळ पुलाचे काम बऱ्याच कालावधीपासून रखडलं होतं. ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गीकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे दक्षिण आणि उत्तर मुंबईतील अंतर हे कमी होणार आहे.

दरम्यान, डिलाईल पोड पुलचे उद्धाटन केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र या पुलाच्या अधिकृत उद्घाटनाप्रसंगी आदित्य यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर स्थानिक आमदारांना आमंत्रित केले जातेच, त्यात नवीन असं काही नाही, अशी स्पष्टीकरण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in