मुंबई : २५ जानेवारी, २०२३ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर, भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा अधिकारी नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेला उल्लेखनीय यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत प्रवासी आणि मालवाहतूक उत्पन्नातून १०१०३.७२ रु. कोटी मिळवले केले, जे २०२२ मधील याच कालावधीतील रु. ८६५९.७७ कोटींच्या तुलनेत १६.६७ टक्के वाढ झाली. टॉय ट्रेन, साईनगर शिर्डी वंदे भारत, शून्य स्क्रॅप मिशन नरेश लालवानी यांच्या नेतृत्वाखाली ३८ वर्षांत कारकिर्दीचा कळस गाठला. लालवानी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आणि उत्कृष्टतेसाठी अतूट बांधिलकीबद्दल मध्य रेल्वे कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय रेल्वेत रुजू झाल्यानंतर लालवानी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात मध्य रेल्वेने तिकीट तपासणीमध्ये सर्व विभागीय रेल्वेत आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. विनातिकीट, अनियमित प्रवास, बुक न केलेल्या सामान प्रवाशांच्या २७.३२ लाख प्रकरणांसह आणि एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी १७६.१७ रु. कोटींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विक्रमी ४९.०३ दशलक्ष टन लोड केले, जे २०२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत ११.५० टक्के वाढ झाली. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात १४७.७७ किमी नवीन लाईन/ दुहेरीकरण प्रकल्पाचे निर्माण पूर्ण केले. मध्य रेल्वेवर १३० किमी प्रतितास वेगाने धावणारा एकूण विभाग आता १२०६.७३ किमी आहे ज्यामध्ये इगतपूरी- नाशिक- भुसावळ- अकोला- वर्धा- बडनेरा- नागपूर, वर्धा- बल्हारशाह आणि पुणे- दौंड मार्ग आहेत.
लालवानी यांच्या नेतृत्वाखाली, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि नागपूर-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस यासारख्या नवीन सेवा सुरू करत विविध ग्राहक-केंद्रित उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय, नेरळ-माथेरान नॅरो गेज टॉय ट्रेनमध्ये या वर्षी प्रवाशांना विहंगम दृश्ये देणारी 'व्हिस्टाडोम' कोचची सुरूवात, प्रवासाचा अनुभव वाढवण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.