
मुंबई : कार्निवल ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्रीकांत भसी यांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील लुटारूंच्या आर्थिक गुलामीतून मुक्तीचे स्वातंत्र्य आंदोलन’ या विषयावर ए. एम. सर्विसेसचे अजय म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. म्हात्रे यांच्या कंपनीने ९७ लाखांच्या सिनेमाविषयक वस्तू श्रीकांत भसी यांच्या कंपनीला दिल्या होत्या. मात्र ठरावीक रक्कम वगळता त्यांना श्रीकांत भसी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. श्रीकांत हे अनेकांचे पैसे बुडवून परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.