मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर ; शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं बोंबाबोंब आंदोलन

महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर ; शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं बोंबाबोंब आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गावर मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. आज(९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात बोंबाबोंब करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था झाली असून अनेक प्रयत्न करुन देखील महामार्गाच्या कामााल गती मिळू शकलेली नाही. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, पर्यटकांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. या महामार्गावर वडखल ते इंदापूर या मार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. या माहामार्गाकडे स्थानिक लोकप्रतिनीधींचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पत्राकरांकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनात पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना संदेश पाठवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in