भाजपच्या शिक्षक परिषदेचे पालिका मुख्यालयासमोर आंदोलन

मुंबई महापालिका शाळेतील मुलांसाठीची शालेय साहित्य खरेदी अद्याप रखडलेलीच आहे
भाजपच्या शिक्षक परिषदेचे पालिका मुख्यालयासमोर आंदोलन

शाळा सुरु होऊन १५ दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही. पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शनिवारी भाजपाच्या शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात शिक्षक, पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

मुंबई महापालिकेतर्फे तब्बल ५० कोटी खर्च करुन करण्यात येणारी मुंबई महापालिका शाळेतील मुलांसाठीची शालेय साहित्य खरेदी अद्याप रखडलेलीच आहे. शाळा सुरु होऊन दुसरा आठवडा उजाडला तरी पालिकेला खरेदीचा मुहुर्त सापडलेला नाही.आता खरेदी झाली तरी वाटप पुर्ण होईपर्यंत तिमाही परिक्षा देण्याची वेळ येईल. याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये सुरेश नावरे, गणेश नाक्ती, आनंद पवार, शैलेंद्र वाघ आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in