आझाद मैदानातील आंदोलनकर्ते रुग्णालयात

आमचा जीव गेला तरी मैदान सोडणार नाही, असा इशारा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.
आझाद मैदानातील आंदोलनकर्ते रुग्णालयात
Published on

मुंबई : दिवाळीचा आनंद सर्वत्र सुरू असताना, आझाद मैदानात आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागण्यांवर कायम आहेत. पीएचडीच्या माध्यमातून डॉक्टर पदवी घेणारे संशोधक विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदानातील धूळ, उन , कचरा, अशुद्ध पाणी, डास आदी कारणांमुळे आजारी पडले आहेत.

महाराष्ट्र सरकारने 'महाज्योती' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील गोरगरीब जनतेतील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत; मात्र या योजना फक्त कागदावरच राहिल्याने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले संशोधक विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

तैय्यबा मुलाणी, वैभव जानकर, अविनाश गुरव, तैय्यबा मुलाणी, रोहित परीट, बापूराव घुंगरगावकर, जेतालाल राठोड, तनुजा पंडित सद्दाम मुजावर हे भावी डॉक्टर आजारी पडले आहेत. खोकला, ताप, सर्दी, श्वसनाचा त्रास, दम लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा इत्यादी आजारांमुळे संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर त्रस्त झाले आहेत. आता आमचा जीव गेला तरी मैदान सोडणार नाही, असा इशारा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in