पुढील वर्षापासून कृषी विषय शालेय अभ्यासक्रमात

या मोहिमेतून विद्यार्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात येणार आहे.
पुढील वर्षापासून कृषी विषय शालेय अभ्यासक्रमात

मुंबर्इ : पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली. शैक्षणिक क्षेत्रात राज्याला देशात पहिल्या क्रमांकात आणण्याचा सरकारने संकल्प सोडला आहे. मुंबर्इ जिल्ह्याचे पालक मंत्री असलेल्या केसरकरांनी माझी शाळा सुंदर शाळा मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५ डिसेंबरपासून सुरु करणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली. रीडमुंबर्इ मोहिम आता राज्यभरात सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in