Ahmedabad Plane Crash: कॅप्टन 'सॅबी'ना अखेरचा निरोप.. आकाशही थंडावले

अहमदाबाद येथे गेल्या आठवड्यात अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाचे प्रमुख वैमानिक कैप्टन सुमित सभरवाल यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Captain-Sumit-Sabharwal
Captain-Sumit-Sabharwalछाया सौजन्य : विजय गोहिल
Published on

मुंबई: अहमदाबाद येथे गेल्या आठवड्यात अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाचे प्रमुख वैमानिक कैप्टन सुमित सभरवाल यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या वृद्ध वडिलांनी साश्रू नयनांनी आपल्या पुत्राला अंतिम निरोप दिला. अपघातानंतर जवळपास आठवडयाने सभरवाल आणि पाटील यांचे पार्थिव सकाळी अहमदाबादहून मुंचाईत आणण्यात आले. सभरवाल यांच्यावर चक्यला येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्योगपती निरंजन हिरानंदानी आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली. यानंतर, शववाहिनीने पार्थिव चकाला येथील स्मशान भूमीत नेण्यात आले.

मित्र स्तब्ध, आवाजात कंप...

मुक्तीधाम स्मशानभूमी, चकाला येथे कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या मृतदेहावर अत्यसंस्कार होत असताना कॅप्टन कपिल कोहळ, सभरवाल यांचे सहकारी आणि मित्र स्तब्ध उभे होते. दु:ख आणि अभिमानाच्या मिश्र भावनांनी त्यांच्या आवाजात कंप होता. 'कॅप्टन सभरवाल आमचे वरिष्ठ होते. आम्ही त्यांना गेली ३५ वर्षे ओळखतो. ते प्रशिक्षणात आमच्या एक बॅच वरचे होते आणि नंतर एअर इंडियामध्येही सोबत होते', असे मित्रांनी सांगितले, "ते आमचे मित्र, सहकारी आणि आता आमचे हिरो आहेत, असेही मित्र म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in