ख्रिसमसनिमित्त अहमदाबाद-थिविम विशेष रेल्वेगाडी

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अहमदाबाद-थिविम विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
ख्रिसमसनिमित्त अहमदाबाद-थिविम विशेष रेल्वेगाडी
Published on

मुंबई : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अहमदाबाद-थिविम विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने अहमदाबाद-थिविम द्वि-साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वेगाडी ८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येईल. प्रत्येक रविवार आणि बुधवारी दुपारी २.१० वाजता अहमदाबाद स्थानकातून ही गाडी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता थिवी स्थानकावर पोहोचेल.

थिविम-अहमदाबाद ही विशेष रेल्वेगाडी ९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी चालविण्यात येईल. ही रेल्वेगाडी सकाळी ११.४० वाजता थिविम स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल. ही गाडी आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in