मुंबईत AI इंजिनिअर्सची मागणी वाढली; लिंक्डइन जॉब्स ऑन द राइज २०२६ सर्वेक्षणातून आशादायी चित्र

मुंबईमध्ये एआय इंजिनिअर नोकरीमधील झपाट्याने वाढत असलेले पद आहे, ज्यामधून भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये एआय टॅलेंटसाठी वाढती मागणी दिसून येते.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : भारतातील प्रोफेशनल्सनी परिवर्तनासाठी मोठ्या महत्त्वाकांक्षेसह नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे. लिंक्डइनच्या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, २०२६ मध्ये ७२ टक्के प्रोफेशनल्स नवीन पदाचा शोध घेत आहेत. पण, एक-तृतीयांशपेक्षा अधिक प्रोफेशनल्सना झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानासह नोकरी करण्यास आवश्यक असलेल्या कौशल्यांसाठी (३८ टक्के) आणि आजच्या वाढत्या स्पर्धेदरम्यान वरचढ ठरण्यासाठी (३८ टक्के) तयार नसल्याचेही वाटते.

प्रोफेशनल्सना या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनने आपली जॉब्स ऑन द राइज २०२६ लिस्ट जारी केली आहे.

मुंबईमध्ये एआय इंजिनिअर नोकरीमधील झपाट्याने वाढत असलेले पद आहे, ज्यामधून भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये एआय टॅलेंटसाठी वाढती मागणी दिसून येते. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त या लिस्टमध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे, जसे कॉन्फरन्स प्रॉड्युसर (#2), डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी (#4), ब्रँड कन्सल्टण्ट (#5), स्ट्रॅटेजिक अडवायजर (#6) आणि व्हेटेरिनेरियन (#10), ज्यामधून शहरातील रोजगार बाजारपेठेत सर्जनशील, सल्लागार, नेतृत्व आणि विशेष व्यावसायिक क्षेत्रांमधील वाढ दिसून येते.

लिंक्डइन करिअर तज्ज्ञ आणि लिंक्डइन इंडिया न्यूजच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्हणाल्या की, मुंबईतील रोजगार बाजारपेठ आपल्याला अनेक वर्षांपासून दिसण्यात न आलेल्या अनुकूल पद्धतींसह लाभदायी ठरत आहे.

प्रकल्प व उद्योगांमधील पदांमध्ये बदल होत असताना नियोक्ते या पदांशी जुळून जाण्याची क्षमता असलेल्या, प्रकल्पांच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवणाऱ्या आणि भूमिकांबाबत स्थिर राहणाऱ्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत.

लिंक्डइनच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील ९४ टक्के प्रोफेशनल्स रोजगार शोधण्यामध्ये सोईस्करपणे एआयचा वापर करतात, पण जवळपास अर्ध्या प्रोफेशनल्सना हायरिंगमध्ये एआयचा वापर करताना वरचढ कसे ठरावे हे माहित नाही. त्यांच्यापैकी ५४ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, रिक्रूटर्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी एआय अडथळा ठरू शकतो. या समस्या असताना देखील ६५ टक्के प्रोफेशनल्सचा विश्वास आहे की, एआयमुळे रिक्रूटर्सकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये सुधारणा होऊ शकते, तसेच रिकूटर व उमेदवार यांच्यामधील परस्परसंवादांमधील तफावत दूर करण्यास मदत होऊ शकते.

मुंबईतील टॉप १० जॉब्स

१. एआय इंजिनिअर

२. कॉन्फरन्स प्रॉड्युसर

३. डायरेक्टर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स

४. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी

५. ब्रँड कन्सल्टंट

६. स्ट्रॅटेजिक अडव्हायजर

७. रिसर्च इन्स्ट्रक्टर

८. ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर

९. क्वॉन्टिटेटिव्ह रिसर्चर

१०. व्हेटेरिनेरियन

logo
marathi.freepressjournal.in