Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

एअर इंडियाच्या इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल संरचनात्मक तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट आणि इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिले.
Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू
Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू
Published on

मुंबई : एअर इंडियाच्या इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल संरचनात्मक तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट आणि इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिले. एअर इंडिया इमारतीची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करून इमारत येत्या १५ ऑगस्टपासून वापरत आणण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे.

नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारतीचे महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरण झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन सर्व दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे करण्यात यावीत. विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना भोसले यांनी केली.

इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे राज्याच्या वैभवाला साजेसे आकर्षक स्वरूप विकसित करावे. यासाठी प्रख्यात वास्तुविशारद तसेच तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in