हवा गुणवता निर्देशांक सुधारला; अवकाळी पावसामुळे हवेत सुधारणा

हवा गुणवता निर्देशांक सुधारला; अवकाळी पावसामुळे हवेत सुधारणा

राज्यात अवकाळी पावसामुळे तर मुंबईत समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सध्या हवा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ६३ नोंदविला गेला. त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेता आला आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. मुंबईतही उन्हाचा तडाखा वाढल्याने मुंबईकर हैराण आहेत. मात्र याच कालावधीत समुद्राकडून वारे वाहू लागल्याने मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता शुक्रवारी सुधारल्याचे निदर्शनास आले. सफर या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीवर मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६३ होता. असे सफर संस्थेचे माजी प्रकल्प संचाकल डॉ. गुरफान बेग यांनी सांगितले.

शुक्रवारी मुंबई येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ६३ नोंदवण्यात आला. तर बीकेसी येथे १३५, चेंबूर ८९, कुलाबा ७१ एक्यूआय हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आल्याचे सफरच्या अहवालातून समोर आले आहे. या सुधारलेल्या हवा गुणवता निर्देशांकामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यात आला.

शहर एक्यूआय दर्जा

  • मुंबई ६३

  • कुलाबा ७१

  • माझगाव ५५

  • बीकेसी १३५

  • मालाड ६३

  • अंधेरी ५७

  • चेंबूर ८९

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in