मुंबईतील मालाड आणि माझगावमधील हवेचा गुणवत्ता स्तर खालावला

मुंबईतील मालाड आणि माझगावमधील हवेचा गुणवत्ता स्तर खालावला

मुंबईतील मालाड आणि माझगावमध्ये हवेचा गुणवत्ता स्तर सुधारण्याचे नाव घेत नाही. मुंबईत उन्हाचा तडाखा असल्यामुळे सध्या धूलिकण हवेत राहत आहेत. मालाड आणि माझगावमध्ये हवेचा स्तर अत्यंत वाईट स्थितीत असल्याचे दिसून आले. अशा वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांना अधिक समस्या जाणवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सध्या उष्णतेचा तडाखा कायम असल्याने धूलिकण जमिनीलगत हवेत तरंगताना दिसतात. मुंबईतील माझगाव परिसर हा अनेकदा वाईट ते अतिवाईट हवेच्या स्तरावर असल्याचे ‘सफर’च्या अहवालातून समोर येते. मंगळवारी माझगावमध्ये ३२४ एक्यूआय (हवा गुणवत्ता निर्देशांक), तर मालाडमध्ये ३१७ एक्यूआय अशा अत्यंत वाईट स्थितीतील हवेचा स्तर दिसून आला. दिल्ली संपूर्ण शहरातील एक्यूआय २०६ म्हणजे वाईट स्थितीत नोंदण्यात आला आहे. त्यामुळे कायमच अतिवाईट स्थितीत असलेला दिल्लीचा स्तर वाईट स्थितीवर आल्याने दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र मालाड, माझगाव येथील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खालावलेल्या स्थितीत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in