Aviation Safety Lapse: विमान तपासांच्या ९ नोंदी अधिकृत रेकॉर्डमधून ‘गहाळ’; तीन वर्षांत केवळ २३ टक्के प्रकरणांचे तपास पूर्ण

विमान अपघात तपास ब्युरोच्या अधिकृत नोंदींच्या पुनरावलोकनातून पारदर्शकता आणि प्रक्रियात्मक पालनामध्ये गंभीर त्रुटी उघडकीला आल्या आहेत.
Aviation Safety Lapse: विमान तपासांच्या ९ नोंदी अधिकृत रेकॉर्डमधून ‘गहाळ’; तीन वर्षांत केवळ २३ टक्के प्रकरणांचे तपास पूर्ण
Published on

धैर्य गजारा/ मुंबई

विमान अपघात तपास ब्युरोच्या (AAIB) अधिकृत नोंदींच्या पुनरावलोकनातून पारदर्शकता आणि प्रक्रियात्मक पालनामध्ये गंभीर त्रुटी उघडकीला आल्या आहेत. २०२३ ते २०२५ दरम्यान सुरू करण्यात आलेल्या नऊ विमानचालन तपास प्रकरणांची माहिती ब्युरोच्या सार्वजनिक डेटाबेसमध्ये उपलब्ध नसल्याचे आढळले आहे. तसेच मागील तीन वर्षांत नोंदवलेल्या प्रकरणांपैकी केवळ २३ टक्के प्रकरणांचे तपास पूर्ण करण्यात तपास ब्युरोला यश आले आहे.

देशात २०१२ मध्ये स्थापनेपासून भारतातील विमान सुरक्षाविषयक प्रमुख नियंत्रण संस्था म्हणून एएआयबी कार्यरत आहे. या आधी विमान अपघात तपासाची जबाबदारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे होती.

‘द फ्री प्रेस जर्नल’ने केलेल्या लेखापरीक्षणात असे आढळले की, मागील तीन वर्षांत नऊ प्रकरणांमध्ये एएआयबीने प्राथमिक, अंतरिम किंवा अंतिम अहवालासारखी मूलभूत कागदपत्रेही सादर केलेली नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in