प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात

मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली.
प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. मलिक यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. शनिवारी दुपारी त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर ते रुग्णालयात आले. मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली.

वैद्यकीय कारणास्तव जामिनावर तुरुंगातून बाहेर

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. पंरतु, नवाब मलिक यांना मूत्रपींड आणि इतरही शारीरिक त्रास असून, त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून नवाब मलिक हे प्रकृतीच्या कारणाने जामीनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फारसे दिसत नव्हते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in