अजित पवारांना डेंग्यूची लागण-प्रफुल्ल पटेल यांची माहिती

राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू चिंतेचा विषय बनला आहे.
अजित पवारांना डेंग्यूची लागण-प्रफुल्ल पटेल यांची माहिती

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात न दिसण्याचे कारण आता समोर आले आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी एक्स समाजमाध्यमावर एक पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी सार्वजनीक कार्यक्रमांना हजेरी न लावल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच मराठा आरक्षणावरून त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला होता. सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्यामुळे त्यांच्या दौऱ्यालाही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शनिवारी अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र त्यांना गावबंदीचा फटका बसल्याचे दिसत आहे. मराठा आंदोलकांचा पवित्रा पाहून अजित पवारांनी बारामतीचा दौरा रद्द केल्याच्या चर्चा होती. या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल म्हणाले आहेत की गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्यामुळे ते पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांनस डेंग्यूची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. शनिवारपासून अजित पवार यांना डेंग्युची लागण झाल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवतील असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने सध्या थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण वाढच आहेत. त्यामुळे लक्षण दिसताच वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in