BMC Election : मुंबईत अजितदादांचा स्वबळाचा नारा; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवार (संग्रहित छायाचित्र)
अजित पवार (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते नवाब मलिक यांच्या नावाला तीव्र विरोध केला होता. मात्र, अजितदादांची राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्याबाबत ठाम राहिल्याने महायुतीला मुंबईत तरी सुरूंग लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीपासून दूर जात राष्ट्रवादी अजित पवार गटाने अखेर स्वबळाचा नारा दिला आहे. रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ३७ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे भाजपचा विरोध असलेल्या नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत ३७ उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून आलेले धनंजय पिसाळ यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३)

२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)

३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),

४) बबन रामचंद्र मदने (७६)

५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)

६) सचिन तांबे (९३)

७) श्रीमती आयेशा शाम्स खान (९६)

८) सज्जू मलिक (१०९)

९) शोभा रत्नाकर जाधव (११३)

१०) हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)

११) अक्षय मोहन पवार (१३५)

१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)

१३) रचना रविंद्र गवस (१४३)

१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)

१५) सोमू चंदू पवार (१४८)

१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५)

१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)

१८) दिशा अमित मोरे (१७१)

१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)

२०) विलास दगडू घुले (४०)

२१) अजय विचारे (५७)

२२) हदिया फैजल कुरेशी (६४)

२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)

२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)

२५) अमित अंकुश पाटील (९५)

२६) धनंजय पिसाळ (१११)

२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)

२८) नागरत्न बनकर (१३९)

२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)

३०) दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)

३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)

३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)

३३) डॉ. सईदा खान (१६८)

३४) बुशरा परवीन मलिक (१७०)

३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)

३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)

३७) श्रीमती फरीन खान (१९७)

logo
marathi.freepressjournal.in