बारसू आंदोलनावरून अजित पवार म्हणाले, "प्रकल्पाला विरुद्ध नाही पण..."

आज बारसूमध्ये झालेल्या आंदोलनावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते, अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या
बारसू आंदोलनावरून अजित पवार म्हणाले, "प्रकल्पाला विरुद्ध नाही पण..."
Published on

आज बारसूमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. अशामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला असून लोकांना त्याचे फायदे समजावून देण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

नेते अजित पवार म्हणाले की, "आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होता काम नये. तसेच, राज्य सरकारने आंदोलकांचा गैरसमज दूर करावा, प्रकल्पामुळे फायदा होत असल्यास लोकांना समजावून सांगावे. एवढंच नव्हे तर, रिफायनरीला विरोध का? प्रशासनाने जाणून घ्यावे." असे सल्ले त्यांनी दिले आहेत. तसेच चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. ते पुढे म्हणाले की, "ठाकरे गटातील राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा असून प्रकल्पातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच, बारसूमधील स्थानिकांच्या समस्या जाणून घ्यावा," असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in