
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यानंतर यावर अजित पवारांना (Ajit Pawar) प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी प्रसार माध्यमांना स्पष्ट सांगितले की, "उगाच सारखं सारखं तेच प्रश्न विचारू नका. माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे." असे म्हणत त्यांनी स्पष्ट सांगितले. पुढे ते म्हणाले की, "त्या घटनेविषयी मी बोलणार नाही. बाकीचे काय बोलतात, त्यावर मला काही बोलायचे नाही. मी त्याबद्दल बोलणार नसून विषय संपला" असे बोलून पुढे काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्याअगोदर ३ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहाटे राजभवनवर शपथ घेतली होती. मात्र, दीड दिवसांतच हे सरकार कोसळले होते. याविषयीचे गूढ अद्याप कायम आहे. त्यातच शरद पवार यांच्या संमतीनेच भाजप-राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात आले होते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे. मात्र, त्याचवेळी फडणवीस यांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. "अजित पवार यावर बोलल्यास मी पुढचं सांगेन," असंही फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे पत्रकारांनी गुरुवारी अजित पवार यांना याबद्दल विचारले. मात्र, त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. ‘‘त्या घटनेविषयी मी बोलणार नाही. बाकीचे काय बोलतात, त्यावर मला काही बोलायचे नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर मला विचारा. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. तुम्ही कितीही उगळून काढले तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,’’ असे अजित पवारांनी पत्रकारांना सुनावले.