Mumbai : अजित पवार विमान अपघात; हायकोर्टात जनहित याचिका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संबंधित विमान कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली.
Mumbai : अजित पवार विमान अपघात; हायकोर्टात जनहित याचिका
Mumbai : अजित पवार विमान अपघात; हायकोर्टात जनहित याचिका
Published on

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संबंधित विमान कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली.

‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता आहे.

पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या विमान अपघाताबाबत चौकशी होणे आवश्यक असून, अपघातामागील कारण स्पष्ट व्हावे. हा अपघात होता की त्यामागे घातपाताची शक्यता आहे, याचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकादाराने केली.

logo
marathi.freepressjournal.in