अजित पवार यांना देवगिरी बंगला कायम; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती विनंती

देवगिरी हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्‍थानानंतरचा दुसरा भव्य बंगला मानला जातो
अजित पवार यांना देवगिरी बंगला कायम;  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती विनंती

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ते उपमुख्यमंत्री असताना वापरत असलेला देवगिरी हाच बंगला मिळाला आहे.

सर्वसाधारणपणे सत्‍ता गेल्‍यानंतर मंत्र्यांना आपले शासकीय निवासस्‍थान रिकामे करावे लागत असते; मात्र अजित पवार यांना देवगिरी हा बंगला कायम ठेवण्यात आला आहे. अजित पवार यांनी देवगिरी कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. अजित पवार उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्‍यांना देवगिरी हा बंगला मिळाला होता. अजित पवार आणि देवगिरी हे नाते तसे जुने आहे. देवगिरी हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्‍थानानंतरचा दुसरा भव्य बंगला मानला जातो. अजित पवार यांनी या बंगल्‍यात जवळपास १६ वर्षांपेक्षा जास्‍त वास्‍तव्य केले आहे.

अजित पवार १९९९ ते २०१४ या कालावधीत देवगिरीवर राहत होते. २०१४ साली हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. आघाडीची सत्‍ता आल्‍यानंतर तो पुन्हा अजित पवार यांना मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मनाचा मोठेपणा दाखवत तसेच मैत्रीला जागून हा बंगला अजित पवार यांच्याकडे कायम ठेवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in