अजित पवारांची 'दादागिरी' सुरूच!

मंत्रिमंडळात व पर्यायाने सत्तेत अजित पवार 'दादा' ठरत असल्याची चर्चा रंगली आहे
अजित पवारांची 'दादागिरी' सुरूच!

मुंबई : ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील २४ रुग्णांच्या मृत्यूवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करणाऱ्या अजित पवार यांची मंत्रिमंडळात 'दादागिरी' सुरूच आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर कांदा खाऊ नका, असा अजब सल्ला देणारे मंत्री दादा भुसे यांनाही अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. मंत्रिमंडळात व पर्यायाने सत्तेत अजित पवार 'दादा' ठरत असल्याची चर्चा रंगली आहे.

भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काहूर माजताच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याचे दर परवडत नसतील तर खाऊ नका. दोन-तीन महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडणार नाही, असा अजब सल्ला दिला. त्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष्य केले जात असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भुसेंना सुनावले. दादा भुसे यांनी अशी प्रतिक्रिया द्यायला नको हवी होती. असे म्हणत, त्यांना अशी विधाने टाळायला सांगू, असे अजितदादा म्हणाले. अजितदादा भुसे यांच्याविषयी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याच बाजूला शांत बसून होते.

मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न केल्यानंतर आता त्यांच्याच मंत्र्याला त्यांच्यासमोरच झापल्याने अजितदादांचं नेमकं चाललंय काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in